सामना कोणत्या पण खेळाचा असो. प्रत्येकजण तो सामना जिंकण्यासाठीच खेळत असतो. त्यासाठी अनेकवेळा वेगवेगळ्या शक्कल हे खेळाडू लढवतात. आपण अनेकवेळा पहिले आहे, फुटबॉल असेल किंवा, व्हॉलीबॉल असेल किंवा क्रिकेट अशा सर्वच खेळांचे सामने चांगलेच रंगतात.
फायनल म्हणजेच अखेरचा सामना जिंकण्यासाठी अनेक खेळाडू वेगवेगळ्या युक्ती लढवतात. कधी यामध्ये यश मिळते तर कधी पराभवाचा सामना देखील करावा लागतो. क्रिकेटचे अनेक रोमांचकारी सामने आपण पहिले आहेत. इतर खेळांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये क्रिकेटची क्रेझ जास्त आहे.
क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये आपण पहिले आहे की, खेळाडू समोरच्या संघाला गोचित टाकण्यासाठी युक्ती लढवतात. बऱ्याचवेळा या युक्ती कामी येतात, मात्र कधी कधी त्याने सुद्धा यश मिळत नाही. आयपीएलच्या सामन्यांमध्ये खास करून आपण पाहिले आहे, सामने जिंकण्यासाठी हे खेळाडू खूप प्रयत्न करत असतात.
ग्राउंडवर एक एक रन थांबवण्यासाठी, खेळाडू कसरत करत बाउंड्री अडवत असतात. आता एका खेळाडूने अशीच एक खास युक्ती लढवली. विशेष म्हणजे याबद्दल जवळपास ८० टक्के क्रिकेटप्रेमींना या एका नियमाबद्दल कोणतीच माहिती नव्हती हे नक्की. भारतीय खेळाडू रविचंद्र अश्विनने स्वतः रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला आणि त्याची इतिहासात नोंद झाली.
राजस्थानच्या संघाचा नुकतंच लखनऊच्या संघासोबत सामना झाला. यामध्ये अश्विनने ही शक्कल लढवली आणि त्यामुळे संघाला फायदाच झाला. सामन्यामध्ये राजस्थानची अवस्था 4 बाद 67 धावा अशी बिकट झाली होती. त्यावेळी अश्विन आणि हेटमायरने डाव सावरला आणि राजस्थानला शंभरचा आकडा पार करून दिला.
परंतु, स्लॉग ओव्हर आल्यानंतर अचानक अश्विनने रियान परागला फलंदाजीला बोलावले. 23 चेंडूत 28 धावा करत अश्विनने एका बाजूने शिमरॉन हेटमायरला धावा करण्यासाठी चांगली साथ दिली. दुसरीकडे हेटमायरने 36 चेंडूत 59 धावांची खेळी केली आणि राजस्थानला 165 धावांपर्यंत पोहचवले.
याच वेळी अश्विनने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला आणि परागला बोलवले. हेटमायर अश्विनच्या रियायर्ड आऊट होण्याबद्दलच्या निर्णयावर म्हणाला की, ‘आश्विन आणि मी खेळत होतो, तो मला चांगली साथ देत होता आणि त्यामुळे संघाला आम्ही अडचणीतून बाहेर काढू शकलो. पण मला अश्विनच्या रिटायर्ड आऊटच्या निर्णयाबाबत काहीच माहिती नव्हते.
मात्र तो निर्णय योग्यच ठरला. आम्ही सामन्यात चांगली धावसंख्या उभारली. कालच्या सामन्यात चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येत नव्हता.’ दरम्यान आश्विनच्या या निर्णयामुळं ‘रिटायर्ड आऊट’ या क्रिकेटच्या नियमाबद्दल सर्वाना माहिती मिळाली. जेव्हा एखादा फलंदाज रिटायर्ड आऊट होतो त्यावेळी तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
तर रिटायर्ड हर्ट या रणनीतीमध्ये फलंदाज पुन्हा बॅटिंग करण्यासाठी येऊ शकतो. आतापर्यंत, शाहिद आफ्रिदी, एस. टोब्गे (भुटान), सुनझामुल इस्लाम या खेळाडूंनी या रणनीतीचा वापर केला होता. आणि आता या रणनीतीचा वापर करणारा चौथा खेळाडू ठरला. त्याच्या या निर्णयाचे सगळीकडूनच कौतुक होत आहे.
Post Views:
0