Connect with us

Marathi News

मुंबई इंडियन्सचा 19 वर्षीय फलंदाज देवाल्ड ब्रेविस गर्लफ्रेंडमुळे आला चर्चेत, प्रेमिकाचे फोटो व्हायरल, दिसते बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षी खूप सुंदर..

--Advertisement--
--Advertisement--

मुंबई इंडियन्सचा 19 वर्षीय फलंदाज देवाल्ड ब्रेविस गर्लफ्रेंडमुळे आला चर्चेत, प्रेमिकाचे फोटो व्हायरल, दिसते बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षी खूप सुंदर..

प्रेमाला वय नसतं. प्रेम कधीही, कोठेही आणि कोणासोबतही होऊ शकत. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी प्रेम होतेच. अगदी अलगद खुलत जाणारी भावना म्हणजे प्रेम. या प्रेमावर कित्येक कवींनी कविता केल्या, लेखकांनी आपल्या शब्दांनी ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रेमाची भावना शब्दांत व्यक्त करणेच अवघड. हळुवार खुलत जाणारी प्रेमकथा नेहमीच थे प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते. आपल्याला आयपीएलच्या सामन्यांच्या वेळी अनेक प्रेमकथा बघायला मिळतात. दमदार आणि जबरदस्त क्रिकेटपटू आणि एखादी मन मोहून घेणारी सुंदरी, दरवर्षीच आपल्याला अशी एक तरी लव्हस्टोरी आयपीएलच्या मैदानावर बघायला मिळते.

सध्या अशाच एका खेळाडूच्या प्रेमकहाणीची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. यामध्ये त्या खेळाडूचे वय, सर्वांसाठी चर्चेचा मुद्दा बनत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत कौतुकाची थाप मिळवतात. या खेळाडूंचा खेळ बघूनच त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होतो. तर काही खेळाडू आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी चर्चेचा विषय ठरतात.

अशाच खास खेळाडूंपैकी एक बेबी एबी आहे. बेबी एबीच सगळंच काही वेगळंच आणि हटके आहे. नेहमीच बेबी एबी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. यंदाच्या आयपीएलच्या मोसमात त्याला मुंबई इंडियन्सने तब्ब्ल तीन कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याच्याकडून संपूर्ण संघाला खुप जास्त अपेक्षा होती.

मात्र केवळ एबी म्हणजेच देवाल्ड ब्रेविसनेच नाही तर मुंबई इंडियन्सच्या सर्वच खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले आहे. आतापर्यंत आयपीएल मध्ये सर्वाधिक म्हणजेच पाचवेळा या संघानं आयपीएलची ट्रॉफी जिंकली. मात्र यावेळी संघाची चांगलीच दुर्दशा झाली आहे. असं असलं तरीही, हे खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत आहेतच.

त्यातच देवाल्ड ब्रेविसचे नाव अनेकांना माघे सोडत आहे, त्याच्या लव्हस्टोरीमुळे तो सध्या चांगल्याच चर्चा रंगवत आहे. दक्षिण आफ्रिकेचा देवाल्ड ब्रेविस केवळ १९ वर्षांचा आहे. मात्र त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचे फोटो सध्या सगळीकडंच वायरल होत आहेत. देवाल्ड ब्रेविस प्रथमच आयपीएलचे सामने खेळत आहे. लिंडी मारी असं देवाल्ड ब्रेविसच्या गर्लफ्रेंडच नाव आहे.

त्या दोघांचे काही खास फोटोज सध्या सगळीकडेच बातम्या रंगवत आहेत. अनेक ठिकाणी हे दोघेही एकत्र दिसलेले आहेत. वायरल होत असलेले फोटोज लिंडी मारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी सोबत फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये त्या दोघांचा आनंद आणि त्यांचे प्रेम बघायला मिळते. देवाल्ड ब्रेविसने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सकडून प्रशिक्षण घेतले असून त्यालाच आपला गुरु म्हणतो.

त्यामुळेच देवाल्ड ब्रेविसला बेबी एबी असं टोपण नाव पडलं आहे. पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला ३ कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची खेळी देखील आपल्या गुरूप्रमाणेच अगदी तुफान आहे. पण अजून पर्यंत आयपीएलच्या सामन्यात त्याचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा निराशाजनकच आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

--Advertisement--

Copyright © 2022 mazinokri.co.in