Connect with us

Marathi News

मुलीला सासरी पाठवताना कधीच या 4 वस्तू देऊ नये…

नमस्कार मित्रांनो,

मुलगी वयात आली कि आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी लागलेली असते. आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटामाटात व आनंदात पार पडावे यासाठी आई वडील कित्येक वर्षांपासून तयारी करत असतात. मुलीला देण्यासाठी हे घे, ते घे हे कित्येक महिने आधी पासूनच सुरु झालेलं असते.

सासरी गेल्यावर मुलीला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून अगदी बारीक सारीक वस्तू देखील घेतल्या जातात. परंतु मुलीच्या प्रेमापोटी आपण अशा काही वस्तू मुलीला देत नाही ना ज्यामुळे आपणच नाही तर आपली सुद्धा अडचणीत येऊ शकते.

शास्त्रा नुसार काही अश्या वस्तू सांगितल्या आहेत ज्या मुलींना सासरी जाताना कधीच देऊ नये. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या वस्तू.

मुलीला सासरी जाताना झाडू देऊ नये. झाडू म्हणजे लक्ष्मी, आणि आपण आपल्या घरची लक्ष्मी मुलीला देऊन टाकणे म्हणजे आपल्या घरातून लक्ष्मीला स्वतःहून बाहेर काढण्यासारखे आहे. मुलीचे चांगले व्हावे, ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी असे सर्वांनाच वाटते.

परंतु आई वडिलांची लक्ष्मी हिरावून आपल्या घरी लक्षमी नांदावी असे कोणत्याही मुलीला वाटत नाही. म्हणून मुलगी सासरी जाताना झाडू कधीही देऊ नये.

सुई, चाकू, सुरी, कैची अश्या धारधार व टोकदार वस्तू देखील मुलीला देऊ नये. कारण या वस्तूंमुळे आपल्यामध्ये व मुलीच्या सासरच्या व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होते.

परस्परांतील संबंध बिघडतात. सासर व माहेर अशा कात्रीत मुलगी सापडते. तिला नेमके काय करावे ते सुचत नाही. म्हणून या वस्तू मुलीला देऊ नयेत.

तवा आणि पोळपाट लाटणे या आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू आहेत. यावरच आपण रोज चपाती किंवा भाकरी बनवतो. यांना साक्षात अन्नपूर्णा देवीचे स्वरूप मानले जाते.

म्हणून या वस्तू मुलीला दिल्यास आपल्या घरातून देवी अन्नपूर्णा निघून जाते. यामुळे आपल्या घरात अन्नधान्याला बरकत मिळत नाही.

चाळण देखील मुलीला सासरी जाताना देऊ नये. चाळणीचे काम काय असते तर चांगले एका बाजूला आणि वाईट एका बाजूला करणे.

जर आपण मुलीला चाळण दिली तर एकतर आपल्याकडे सर्व काही चांगले राहते आणि तिच्याकडे वाईट जाते. किंवा आपल्याकडे वाईट राहते व सर्व चांगले तिच्या सोबत जाते.

घरी बनवलेले लोणचे देखील मुलीला देऊ नये. काही घरांमध्ये प्रत्येक वर्षी लोणचे बनवून मुलीला सासरी दिले जाते. लोणचे हे आंबट व तिखट असते. यामुळे आपले संबंध देखील आंबट व तिखट होऊ शकतात.

तुमच्या लक्षात आले असेलच कोण कोणत्या वस्तू मुलीला देऊ नये.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

--Advertisement--

Copyright © 2022 mazinokri.co.in